मुंबई प्रतिनिधी / भारत कवितके : सहावे राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन लवकरच होणार जाहीर असल्याचे प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रीशताब्दी जयंती ३१ मे २०२५ रोजी असून तेथून पुढे वर्ष भर महाराष्ट्र शासनाकडून जयंती साजरी केली जाईल असे समजते, प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले पुढे म्हणाले की,” आजवर धनगर समाजाचे साहित्य संमेलन विदर्भात झालेले नाही, आदिवासी धनगर साहित्य संमेलन विदर्भात घेण्यासाठी संमेलनाचे सचीव ज्ञानेश्वर ढोमणे सर प्रयत्न शील आहेत, तर शिवाजी बंडगर सर करमाळा येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेण्यासाठी उत्सुक आहेत,तर इंजिनिअर धुळाभाऊ शेंडगे यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेंगलोर मध्ये घेतले तर सर्वोतोपरी मदत करीन असे सांगितले,दुसरे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने या बाबतीत साहित्य, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
आतापर्यंतचे सर्व साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संयोजक, सर्व क्षेत्रातील सहभागी यांचे बरोबर चर्चा करुन लवकरच सहावे साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्यात करण्याचा ठाम निर्णय असून लवकरच याबाबत माहिती जाहीर करुन साहित्य प्रेमींना आनंदाची बातमी देऊ,”या बाबत सोलापूर येथील ताराई हाँटेलमध्ये आदिवासी धनगर समाजातील गोविंद काळे, उज्ज्वल कुमार माने, डॉ.मुरहरी केळे, डॉ.देविदास पोटे, डॉ.मुकुंद वलेकर, डॉ.वर्षा चौरे, लेखक रामभाऊ लांडे, कविता पोटे, अविनाश ठेंगील, विनायक काळदाते, आणि प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन लवकरच होणार जाहीर – प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले.

0Share
Leave a reply