Disha Shakti

सामाजिक

उद्या पळसपूर येथे साजरा होणार शिवजयंती उत्सव, पळसपूर ग्रामस्थांतर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोज 

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर /वसंत रांधवण :  तालुक्यातील पळसपूर येथे यावर्षी ग्रामस्थांच्या वतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सोमवार दि. १७ मार्चला साजरा होणार असून तयारीची लगबग सुरू झाली आहे. या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण पळसपूर परिसर भगवेमय होणार असून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक शिवप्रेमी ग्रामस्थ पळसपूर यांनी दिली. 

आज रविवार दि. १६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता शिवनेरी ते पळसपूर शिव ज्योत आणण्यासाठी गड किल्ला शिवनेरी कडे प्रस्थान होणार आहे. सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शिवज्योतिचे भव्य आगमन मिरवणूक काढण्यात येते. सायंकाळी सहा वाजता शिवजयंती कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व शिवरायांची आरती झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता पळसपूर ग्रामस्थांच्या वतीने शिवभोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यावेळी रात्री दहा वाजता धर्मवीर संभाजी राजे महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना दाखविण्यात येणार आहे. तरी पळसपूर परिसरातील तमाम शिवभक्तांनी सहकुटुंब सहपरिवार या शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ पळसपूर व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!