राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन 997/2023 भादवी 394 या गुन्ह्यातील दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शांताराम भानुदास काळकुंड वय 26 यास दिनांक 14 03 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार विकास वैराळ, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, नदीम पठाण, सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकाने अहिल्यानगर येथे सापळा रचून अटक केले व आज मान्य न्यायालयापुढे हजर ठेवले असता माननीय न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली.
फिर्यादी विशाल बाळासाहेब काळे राहणार तनपुरे गल्ली वय 26 वर्ष यांच्याकडून आरोपीने तनपुरे कॉम्प्लेक्स पाठीमागे प्रगती विद्यालय रोड राहुरी येथून दिनांक 31 8 2023 रोजी मोबाईल फोन व 2700 कॅश जबरी चोरी करून चोरून नेलेली होती.
सदर गुन्हयातील आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला असून मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे व रोख रकमेबाबत तपास सुरू आहेसदर आरोपीचे रिमांड मिळणे कामे सरकारी अभियोकता श्री पर्बत साहेब यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले. पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार वैराळ विकास करत आहे
Leave a reply