Disha Shakti

सामाजिक

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठाणच्या वतीने अनिकेत भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वन्य जीवांची भागवली तहान

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी  / प्रविण वाघमोडे  : इंदापूर तालुक्यातील अकोले वनपरिक्षेत्र हद्दीतील वन्यजीवांसाठी उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी व त्यांना कुठेतरी मायेचा ओलावा मिळावा तसेच संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रमाणे स्व. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी नेहमी मदतीचा हात पुढे ठेवणारे अनिकेत भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टँकरद्वारे पानवट्यामध्ये पाणी सोडण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 इंदापूर तालुक्याचं नाक म्हणून भिगवणला ओळखले जाते तेथे जवळ असणारे अकोले या ठिकाणी वनपरिक्षेत्रात विविध वन्य जीव आपले पाण्यासाठी भटकंती करत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा वास्तव देखील आहे.मार्च, एप्रिल ते मे उन्हाळा असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले आहेत वन्यजीवांची पिण्याच्या पाण्यासाठी वन वन सुरू होते. प्रसंगी वन्यजीवांवर हल्ला तसेच विविध कारणे मृत्यू होण्याच्या घटनात वाढ होते. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आलेला आहे.

या कार्यक्रम प्रसंगी  अनिकेत नाना भरणे, ॲड.हर्षवर्धन ढवळे, चेअरमन संजय बंडगर, विशाल बंडगर, अजित शिंदे, राहुल येडे, रोहित हेळकर, ॲड.शैलेश धापटे, ललित आटोळे, दिपक आटोळे, नागेश धुमाळ, निलेश बंडगर, सौरभ खाडे उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!