नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : प्रहार प्रमुख तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधी पाचाड स्थळाजवळ दिनांक 21, 22 व 23 मार्च 2025 रोजी तीन दिवसीय आंदोलन होणार आहे. या आंदोलनात दिव्यांगाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत
दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा
दिव्यांगांना घरकुल मिळावे
दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे.
या प्रमुख मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग आमरण उपोषण करणार असून रक्तदान आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पायथ्याशी आंदोलन केले जाईल. आंदोलनाला येणाऱ्या सर्व दिव्यांगांनी 21, 22 व 23 मार्च 2025 असे तीन दिवस आपल्याला सहभाग घ्यायचा आहे याच तयारीने यायचे आहे.
राज्यातील सर्वच राज्य कोअर कमिटी सदस्यांनी, राज्य पदाधिकारी, विभागप्रमुख, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी कसलेही कारण न सांगता या दिव्यांगांच्या अस्तित्वाच्या आंदोलनात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातून किमान 100 दिव्यांग या आंदोलनात सहभाग घेतील अशी जबाबदारी जिल्हाध्यक्षांकडे राहील.
आंदोलनास गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची लगेचच हकालपट्टी करण्यात येईल. तरी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी 21. 22. 23. मार्च 2025 रोजी तीन दिवशी य होत असलेल्या अमरण उपोषणास आंदोलनास नायगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनास सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा “कार्याध्यक्ष” मा गोपीनाथ सांगवीकर मुंडे. प्रहार दिव्यांग संघटना नायगाव “तालुका अध्यक्ष” मा साईनाथ बोईनवाड यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होत असलेल्या आंदोलनास हजारोंच्या संख्येने सामील व्हा – गोपीनाथ सांगवीकर (मुंडे)

0Share
Leave a reply