दिशाशक्ती प्रतिनिधी / इनायत अत्तार : गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ग्राम अधिकारी यांनी जातप- त्रिंबकपूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा ती २१ मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातप या ठिकाणी आयोजित केली आहे.
या ग्रामसभेच्या अजेंठ्यामध्ये निवेदनात दिलेले जलजीवन मिशन पाणी योजना, घरकुल योजना, गावातील आजपर्यंत न झालेले पाणंद रस्ते हे मुद्दे प्रामुख्याने चर्चेसाठी घेण्यात आलेले आहेत. आता ही ग्रामसभा कशी होते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहेत. गावात केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ही ग्रामसभा अत्यंत वादळी होण्याची शक्यता आहे. तरी या ग्रामसभेसाठी जातप आणि त्रिंबकपूर या दोन्ही ग्रामस्थांनी सकाळी 09.30 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती गावातील जागरूक व्यक्तींनी केलेली आहे.
राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली जातप – त्रिंबकपूरच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

0Share
Leave a reply