प्रिंट मिडियाच्या माध्यमातून “साप्ताहिक ठाकर शक्ति” हे वृत्तपत्र नव्याने सुरू होत आहे. सदर वृत्तपत्राच्या सहसंपादक पदी दिनांक 28/09/2021 रोजी मौजे डोळासणे ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील ठाकर समाजाचे युवा नेते “जगदीश बबन पारधी” यांची निवड करण्यात येत आहे. सह संपादक पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व नोकरी तसेच आदिवासींसाठी असणार्या सरकारच्या विविध योजना यांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जाबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर समाजातील लोकांना येणार्या विविध अडचणी वृत्तपत्रातून सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.
साप्ताहिक ठाकर शक्ति परिवारा तर्फे त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा .