बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : नांदेड येथे महाराष्ट्र शासन व कृषी विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिलोली तालुक्यातील कासराळी येथील प्रगतिशील शेतकरी, बसवंत पाटील कासराळीकर यांचा सन्मान करण्यात आला.आपल्या अनुभवाच्या माध्यमातून शेतीमध्ये अभिनव प्रयोग करून वैशिष्ट्यपूर्ण उत्पन्न काडणारे कासराळी येथील शेतीनिष्ठ शेतकरी बसवंत पाटील कासराळीकर यांना कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होणारे कासराळी येथील हे तालुक्यातील पहिले शेतकरी आहेत.
नांदेड येथील दोन दिवशीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव कार्यक्रमांमध्ये बसवंत पाटील कासराळीकर यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, सेवानिवृत्त कृषी संचालक सुरेशराव अंबुलगेकर, विठ्ठल गिते उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर, नागरगोजे सर कृषी उपसंचालक व मावरांच्या उपस्थितीमध्ये उत्कृष्ट प्रगतिशील शेतकरी म्हणून बसवंत पाटील कासराळीकर यांना जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या निमित्ताने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील व विभाग स्तरातील कार्यक्रमांमध्ये होत असलेल्या सन्मानाबद्दल बसवंत पाटील कासराळीकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a reply