पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दि. ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या यात्रोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी फकीर शहावाली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारुगोळ्याची आतषबाजी कण्यात येणार आहे. तसेच परंपरेनुसार मंगळवार दि.१ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता बनाईदेवी काठी मिरवणूक रात्री ७.३० वाजता भव्य छबिना मिरवणूक व जागरण गोंधळ रात्री १० वाजता निलेश कुमार आहिरेकर सह रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा, बुधवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मळगंगा देवीची काठी मिरवणूक, दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. रात्री ७.३० वाजता भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वाजता मळगंगा मंदिरासमोर जागरण गोंधळ,गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुक्ताई देवीची काठी मिरवणूक, यात्रेनिमित्त सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ८.३० वाजता छबिना मिरवणूक, रात्री १० वाजता देवीसमोर जागरण गोंधळ यात्रोत्सवात दररोज भव्य मिरवणुकीसाठी मुख्य पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा सनई पथक खास आकर्षण असणार आहे. यात्रोत्सव असल्या कारणाने गावातील मुख्य प्रवेशद्वार तसेच संपूर्ण मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्याचे कामे अंतिम टप्प्यात आले आहेत. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन बनाईदेवी यात्रा कमिटीच्या वतीने तसेच समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
टाकळी ढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध धार्मिक व इतर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या सूचनेनुसार यात्रोत्सवाकरीता अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. यात्रोत्सवा दरम्यान, हुल्लडबाजी करणाऱ्यांसह भुरट्या चोरांवर नजर ठेवण्याची सूचना पथकाला करण्यात आली आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0Share
Leave a reply