Disha Shakti

इतर

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीमध्ये पाण्याच्या ओढ्यावरील अतिक्रमणा प्रकरणी तहसीलदार व पाटबंधारे विभागास निवेदन

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महाशयाने चक्क पाण्याच्या ओढयाची स्वतःच्या फायद्यासाठी दिशा बदलली असल्याने ओढया पुढील नागरीकांनी सदर ओढ्यासंदर्भात तहसीलदार व पाटबंधारे विभागास तक्रार अर्ज केलेला होता. गैरअर्जदार यांनी नेवासा-संगमनेर रोड लगत दत्तनगर येथे जातांना बसंतबहार मंगल कार्यालय जवळ एक ओढा आहे. सदर ओढयावर गैरअर्जदार जनार्दन खाजेकर या व्यक्तीने खूप बेकायदेशीर मोठया प्रमाणात अतिक्रमन केलेले आहे.

सदर ओढयाचा उपयोग हा नैसर्गिकरित्या पावसामुळे होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी होत असतो. सदर ओढ्‌याची रुंदी ही साधारनतः २० फुट आहे. सदर ओढ्‌यालगत गैरअर्जदार यांचा प्लॉट असुन सदर प्लॉटचे सोयीसाठी गैरअर्जदार जनार्दन खाजेकर यांनी ओढ्‌यावर अतिक्रमन करून तेथे पक्के सिमेंट कॉक्रीटचा स्लॅब तयार केल्यामुळे सदर ओढ्‌यातुन वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अटकाव झालेला आहे. सदर ओढ्‌याला अटकाव निर्माण झाल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सदर ओढ्‌यातुन वाहनारे अतिरिक्त पाणी हे ओढ्‌याची दिशा सोडून रास्त्यावरून वाहील, त्यामुळे रस्ता फुटण्याची शक्यता आहे. तसेच नागरीकांच्या रहदारीला देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील. तरी गैरअर्जदार जनार्दन खाजेकर यांनी सदर वर नमुद ओढ्यावर केलेले अतिक्रमन हे लवकरात लवकर हटविण्यात यावे, व सदरचा ओढा हा पुर्ववत करण्यात यावा, अतिक्रमन मुक्त करण्यात यावे असे निवेदन श्रीरामपूर शहराचे नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे तसेच वडाळा पाटबंधारे अधिकारी श्री संजय कलापुरे यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी इनायत अत्तार, अमोल साबणे राजेंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!