Disha Shakti

कृषी विषयी

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कापूस सुधार प्रकल्पाच्या शेततळ्याचे जलपूजन संपन्न

Spread the love

राहुरी विद्यापीठ / रमेश खेमनर : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पाच्या शेततळ्याचे जलपूजन दि. २० मार्च रोजी संपन्न झाले. या शेततळ्याचे जलपूजन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते पार पडले. सदरील शेततळे हे कापूस सुधार प्रकल्प येथील येथे तयार करण्यात आले असून या शेततळ्याची लांबी 110 मीटर असून रुंदी 74 मीटर व खोली 9 मीटर आहे हे शेततळे एकूण 8140 चौ. मी. असून शेततळ्याची साठवण क्षमता 7 कोटी लिटर इतकी आहे. या शेततळ्याचे खोदकाम 2015 मध्ये सुरु झाले होते.

या शेततळ्यात तत्कालीन संशोधन संचालक डॉ.आर.एस.पाटील व माजी कुलगुरू डॉ.तुकाराम मोरे यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक पेपर टाकण्यात आला आहे. कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील शेततळे हे टेलला असल्यामुळे पाटाचे पाणी पूर्ण क्षमतेने येत नसल्याने कार्यालय प्रमुख डॉ.पवन कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठाच्या जेसीबीच्या सहाय्याने पाणी येण्यापूर्वी चर दुरुस्त करून घेतला व 20 मार्च रोजी शेततळे पूर्ण क्षमतेने भरण्यात आले. या शेततळ्यामुळे प्रक्षेत्रावरील एकूण 50 हेक्टर क्षेत्रावर या तळ्याचा शाश्वत विकास पाणी देण्यासाठी उपयोग होणार आहे.

तसेच प्रक्षेत्रावर कापूस भुईमूग व ज्यूट या पिकांचे प्रायोगिक चाचणी प्रयोग घेतले जातात तसेच प्रक्षेत्रावर भुईमूग सोयाबीन गहू हरभरा व कांदा पिकांचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे प्रक्षेत्रावरील पिकांना विहीर व नदीवरील लिफ्टने मोटारीच्या साह्याने पिकांना पाणी दिले जात होते आता शेततळे परिपूर्ण तयार झाल्याने हे शेततळे पिकांना लाभदायक ठरणार आहे.

 या शेततळ्याच्या जलपूजनाप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नितीन दानवले, विस्तार शिक्षण संचालक डॉ.ससाने, सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रशांत बोडके, उद्यानविद्या विभाग विभाग प्रमुख डॉ.भरत पाटील, डॉ. सुरेश दोडके, डॉ.सचिन सदाफळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील शेतकरी सचिन शेटे, भाऊसाहेब शेटे, नंदू हरिचंद्रे उपस्थित होते. पाट पाण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे बुवासाहेब मस्के व सचिन शेटे यांचा विद्या पिठाचे संशोधन संचालक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला

तसेच विद्यापीठ व शेतकरी यांचे सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचे मार्गदर्शन डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक गणेश धोंडे व पी.टी.कुसळकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन कुलवाल यांनी केले व सूत्रसंचालन डॉ.नंदकुमार भुते यांनी केले व आभार प्रदर्शन पी.टी.कुसळकर यांनी केले सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी वर्ग व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!