Disha Shakti

कृषी विषयी

*प्रशांत डिक्कर यांच्या आंदोलनाच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले कृषी पंपाचे चार ट्रान्सफॉर्मर.

Spread the love

*प्रशांत डिक्कर यांच्या आंदोलनाच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले कृषी पंपाचे चार ट्रान्सफॉर्मर.*
संग्रामपूर : तालुक्यातील कृषी पंपाचे जळालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्क्ष प्रशांत डिक्कर यांनी १७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांन सह संग्रामपूर महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन केले होते. तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करा. या मागणीसाठी संग्रामपूर महावितरण कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी प्रशांत डिक्कर व शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता एस. बि‌. नवलकर यांच्या दालनात सकाळी ११ वा.पासुन रात्री ९ वाजेपर्यंत ठाण मांडुन बसल्याने महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यां आंदोलनाची दखल घेत. रात्री १०:३० वाजता मुख्य अभियंता डोये अकोला, अधिक्षक अभियंता एस. एम. आकडे बुलडाणा, कार्यकारी अभियंता अभिजित जिवनसिंग डिनोरे खामगाव यांनी प्रशांत डिक्कर यांच्या सोबत फोनवर चर्चा करून दोन दिवसात नविन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले होते. महावितरणने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत दि.२१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सावळा शिवारातील वानखडे डि.पी, निरोड शिवारातील जाधव डि.पी, देऊळगाव शिवारातील म्हसाळ डि.पी., अकोली शिवारातील श्रीधर डि.पी या चारही डि.पी. वरील महावितरणने नविन ट्रान्सफॉर्मर बसवुन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकाला जिवनदान मिळाले आहे. अशा संकट समयी आम्हा शेतकऱ्यांना साथ दिली. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, सहाय्यक अभियंता एस बि नवलकर यांचे आभार मानले. यावेळी कॉंग्रेसचे नेते राजुबाप्पु देशमुख, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे,शाम ठाकरे, विठ्ठल वखारे,अनुप देशमुख, विठ्ठल ताथोड,नयन इंगळे,सुपडा सोनोने,वैभव मुरुख, मंगेश भटकर, गजानन रावनकार,विशाल चोपडे, विशाल सांवत,गणेश वहितकार,शुभम वखारे,दिलिप वानखडे, रोशन देशमुख यांच्या सह शेतकरी आंदोलनात उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!