विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : ए.आई.एम.आई.एम. व स्थानिक नागरिकांच्या वतीने .अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवा याकरता हरेगाव रोड (आझाद पोल्ट्री फार्म) या ठिकाणी घनदाट लोकवस्ती तयार झाली आहे. या वस्तीमध्ये महिलावर्ग, विद्यार्थी, लहानमुले, मजूर, व्यापारीवर्ग असे लोक राहतात. रस्त्याच्या पलिकडच्या दिशेने किराणा दुकाण, पिठाची गिरणी, बेकरी व अन्य गरजउपयोगी साधणे असल्या कारणाने रस्त्या ओलांडावा लागतो. तसेच शाळा व कॉलेजचे विद्यार्थी बसची वाट पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असतात.
यामुळे दिवसभर नागरीकांची रस्त्यावर ये-जा चालू असते. मात्र रस्त्यावर गतिरोधक नसल्याने दोन्ही दिशेने येणारे-जाणारे वाहने अत्यंत गतीने चालतात. यामूळे स्थानिकांची गैरसोय होते. वाहनांची गती जास्त असल्याकारणाने येथे नेहमीच अपघात होतात या मध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे पी डब्ल्यू डी चे वराळे साहेब यांना निवेदन देण्यात आले आपण तेथे उंच गतिरोधक बसवुन त्याला रंग मारावा
तसेच गतिरोधक दर्शविण्याकरिता एक फलक त्या ठिकाणी लावण्यात यावा जेणे करूण जास्त गतीत येणाऱ्या वाहनांना लांबुनच गतिरोधक दिसतील आणि होणारे अपघात टळतील तसेच स्थानिक नागरीकांची व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गैरसोय हि दुर होईल.याप्रसंगी एम आय एम चे माजी युवा जिल्हाध्यक्ष तनवीर सय्यद ,इम्रान बागवान, अरबाज शेख,मुजमिल सय्यद,भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे राज खान अदी उपस्थित होते.
हरेगावरोड, आझादपोल्ट्री फार्म या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची एम आय एम चे मागणी

0Share
Leave a reply