अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगालगुंडे : अणदूर येथील महिला मंडळाच्या विशेषता सामाजिक कार्यकर्त्या, धाराशिव जिल्हा जिजाऊ ब्रिगेड, जिल्हा विशाखा समिती अध्यक्ष तथा पोर्णिमा महिला मंडळाच्या सचिव बाबई चव्हाण यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील महिलांच्या सहवासात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते सुनील मालक चव्हाण यांनी पेढा भरून शुभेच्छा दिल्या.छोटे खानी कार्यक्रमात बोलताना सुनील चव्हाण म्हणाले की, अल्पावधीतच बाबई चे कार्य निश्चितच भूषणावहअसून भावी पिढीला प्रेरणा व दिशा देणारे ठरेल. महिलांच्या सबलीकरणासह सामाजिक उपक्रमातील तिचा सहभाग लक्षनिय असून येणारा काळ तीला प्रोत्साहित करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी दिशाशक्ती परिवार, व जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे , श्रीकांत अणदूरकर, दयानंद काळुंखे, शिवशंकर तिरगुळे,सचिन तोगी, संजू आळूरे,, चंद्रकांत गुड्ड, शिवाजी कांबळे यांनी सत्कार करून सदिच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बाबई चव्हाण म्हणाल्या की, आपण केवळ निमित्त असून महिलांच्या अथक पाठिंबा व विश्वासामुळेच संघटनेचे काम मार्गी लागत असून भावी काळात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणार असून पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळेच विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे भावना व्यक्त करून खरे श्रेय पत्रकारांचे व महिलांच्या प्रामाणिक पाठबळाचे असल्याचे सांगितले.
Leave a reply