नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दि.23/03/2025 रोजी मा.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा अजितदादा पवार हे नरसी येथील कार्यक्रमासाठी आले असता त्यांना संगणक परिचालक नायगाव तालुक्याच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत च्या सुधारीत आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणेबाबत चे निवेदन देऊन आपल्या मागणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
हे निवेदन राज्याध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे यांच्या आदेशानुसार तसेच लातुर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी व नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम पा डिकळे व सचिव तुळशीराम बैनवाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री यांची भेट घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष दिलिपराव धर्माधिकारी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटनीस मा वसंत पा सुगावे यांच्या सहकार्य लाभले.
या संघटनेशी विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासीत केले आहे.यावेळी नायगांव तालुका अध्यक्ष गणेश चोंडे, सचिव तिरुपती.पा.जाधव, उपाध्यक्ष रामेश्वर पा.पवार, गजानन.पा.कदम, बाजीराव पा ढगे,मौला शेख, प्रल्हाद पा.अडकिने, मालू झगडे, गुलाब वानखेडे, दिपक गजभारे, साहेबराव पा ढगे, तसेच तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांना संगणक परिचालक नायगाव तालुक्याच्या वतीने निवेदन सादर….!

0Share
Leave a reply