तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ. शोभा प्रभाकर बिराजदार यांचा तब्बल 29 वर्षाच्या सेवापूर्ती गौरव सोहळा हुतात्मा स्मारक येथे शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापन समितीने केले आहे.
या सेवापूर्ती सोहळ्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, निळकंठेश्वर मठाचे मताधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, सरपंच रामचंद्र आलूरे, शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. जितेंद्र कानडे, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुनील सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला असून शिक्षन प्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी केले आहे.
Leave a reply