राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्व सुरशे : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले आहे. प्रहार दिव्यांग संघटनेने केलेल्या मागणीनुसार राहुरी खुर्द ग्रामपंचायतने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत यांच्या स्व निधीतून दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे निधीचे धनादेशचे वाटप सरपंच मालती साखरे व ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते उपस्थित दिव्यांग व्यक्तींना धनादेशचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच मालती ताई साखरे, उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायतचे सदस्य राम तोडमल, आश्विनी कुमावत, लता माळी, मनीषा शेंडे, पोपट चोपडे, असफखान पठाण व प्रहार दिव्यांग संघटनेचे दत्तात्रय खेमनर, आदिनाथ दवणे, सुनील पंडित, अरुण पटारे, अनिल थोरात, रुपाली शिंदे, बबलू पंडित, भगवान मोरे यांच्यासह, अनेक दिव्यांग व्यक्ती व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply