दिशा शक्ती न्यूज प्रतिनिधी / मोहन शेगर : नगर तालुक्यातील इमामपूर हददीतील डोंगरास गुरुवारी (ता.२७) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग तीन तालुक्याच्या हद्दीत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर, नेवासे व राहुरीतील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाकडून आगीवर नियंत्रण
इमामपूर घाटाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराला गुरुवारी (ता.२७) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. मात्र, डोंगरावरील गवत व काही झाडे पेटल्याने जवळ जाणे अवघड झाले होते. सायंकाळी आगीचे लोळ इमामपूर वांजोळी, खोसपुरी, गुंजाळे गावाच्या हद्दीत पसरली. वनविभागाच्या वतीने हवेच्या चार यंत्रांद्वारे ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
Leave a reply