Disha Shakti

सामाजिक

सुनील मालक चव्हाण यांचा वाढदिवस, विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन, युवकांचे दबंग नेते तथा राजकारणातील हुकमी एक्का सुनील मालक चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रभाग सहा मध्ये डॉक्टर विवेक बिराजदार व ग्रामपंचायत सदस्य गणेश सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून चिवरी पाटी, सिद्धार्थ नगर व इतर महत्त्वाच्या ठिकाणी ज्येष्ठासाठी सिमेंट वाकडे टाकून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल. डॉक्टर व्यंकटेश बिराजदार यांनी दिवसभर रुग्णांचे मोफत तपासणी व उपचार केले. यावेळी माझे पंचायत समिती सभापती बालाजी मोकाशी, यश कंट्रक्शन चे मालक मधुकर अण्णा बनपट्टे, प्रकाश बनपट्टे सह नागरिक उपस्थित होते.

नळदुर्ग येथे संजीवनी मेडिकल, 8 फार्म ग्रुप, व नळदृग शहर पत्रकार संघाच्या वतीने थंडगार जार च्या पानपोइचे उद्घाटन निमा संघटनेचे सचिव डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोले, दादासाहेब बनसोडे, मारुती खा, उमेश जाधव, जीवन मोजगे, संजय जाधव, गुणवंत मुळे, सचिन कासार, तेजस जाधव, प्रतीक किलजे सहा मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत अंदुरकर तर वृषभ जाधव यांनी आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!