विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : सामान्य नागरिक राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील विवाहित महिला स्वाती दशरथ पवार 37 धंदा शेती राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी ही त्यांचे राहते घरी बारागाव नांदूर येथून दिनांक 28/03/2025 गवत कापायला सांगून जाते असे सांगून त्यांच्या शेतातील उसात गेलेली होती. सदर मिसिंग महिलेच्या घरी दोन जनावरे असल्यामुळे तिचे पती व ती नेहमीच सकाळ-संध्याकाळ गाईंसाठी गवत आणायला जातात. परंतु दिनांक 28 /3/ 2025 रोजी तिचे पतीची तब्येत बरी नसल्याने ती एकटीच सायंकाळी 05/00 वाजण्याच्या सुमारास गवत आणायला गेली होती. संध्याकाळी साडेसहा सात वाजूनही ती परत न आल्यामुळे तिचे कुटुंबीयांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला असता ती गवत आणायला घेऊन गेलेले कापड , तिच्या मोबाईलचा कव्हर , तिचे मंगळसूत्र , हातातील फुटलेल्या बांगड्या, मोबाईल बॅटरी , तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा ज्यास रक्त लागलेले.
महिलेच्या अंगात असलेला शर्ट फाटलेल्या अवस्थेत, महिलेच्या अंगावरील साडीचा तुकडा, फाटलेल्या अवस्थेत, स्कार्फ असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच कापून ठेवलेले गवतही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्यामुळे तिच्या नातेवाईकांचा ती गवत कापत असताना तिला बिबट्याने हमला करून घेऊन गेला आहे असा समज झाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस व फॉरेस्ट विभागाशी संपर्क साधला. पोलीस व फॉरेस्ट विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी सदर महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने तिचे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला दिनांक 30/03/2025 रोजी मध्यरात्री 01/00 वाजता मिसिंग केस दाखल केली.
सदर घटना घडल्या ठिकाणांची पोलीस विभागामार्फत फॉरेन्सिक टीम व श्वानपथक यांच्यामार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली. परंतु सदर ठिकाणी कोठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे असा पुरावा मिळाला नाही. त्यावरून सदर प्रकरणांमध्ये सदर महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला अशी खात्री झाली परंतु सदर विवाहित महिला गायब झाल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. महिला शेतात जाण्यास घाबरु लागल्या होत्या.त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर महिलेचा वेगाने तपास सुरू केला. व पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व अचूक तांत्रिक विश्लेषणातून सदर महिलेचा शोध घेतला असता ती महिला प्रवरा संगम तालुका येथे मिळून आल्याने तिचा 48 तासात शोध घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके मॅडम पोलीस पो.ना .गणेश सानप, पोहेका विकास वैराळ, पोलीस शिपाई सागर नवले , अंबादास गीते, प्रमोद ढाकणे, सायबर सेल दक्षिण विभाग सचिन धनाड यांच्या पथकाने केली.
बारागाव नांदूर येथील बिबट्याने हमला करून घेऊन गेल्याची अफवा पसरवलेल्या विवाहित महिलेचा राहुरी पोलिसांकडून 48 तासात शोध

0Share
Leave a reply