Disha Shakti

इतर

तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, भव्य निकाली कुस्त्या सह रंगणार बैलगाडा शर्यतीचे मैदान

Spread the love

दिशाशक्ती / रमेश खेमनर : तालुक्यातील तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. १ एप्रील रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कावड मिरवणूक भव्य आकर्षण सुप्रसिद्ध  डीजेच्या माध्यमातून मिरवणूक होणार आहे. मुळामाई देवी मंदिर येथे प्रथेप्रमाणे सवासणी कार्यक्रम सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील व सायंकाळी ७ वाजता छबिना मिरवणूक होईल व त्याच दिवशी मंगळवारी दुपारी ४ ते ८ या वेळेत भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे.

 

या कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवानांची हजेरी लागणार आहे. त्यानिमित्ताने मुळामाई यात्रा उत्सव कमिटी तमनर आखाडा यांच्या वतीने कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे. या भव्य कुस्ती मैदानास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र केसरी पैं.गुलाबनाना बर्डे व राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागरभाऊ बेग हे उपस्थित राहणार आहेत.

मुळामाई केसरी २०२५ साठी महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान पै. विजय शिंदे (बाल गोपाळ तालीम वाशीम) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै.विक्रम शेटे (व्यंकोबा तालीम इचलकरंजी) यांची नंबर एकची कुस्ती घेण्यात येणार आहे. त्यासाठी रक्कम रुपये 1 लाख व तसेच कै. तुकाराम सखाराम तमनर यांच्या स्मरणार्थ सरपंच श्रीमती मनीषाताई आप्पासाहेब तमनर यांच्याकडून प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस मुळामाई केसरी मानाची चांदीची गदा ठेवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ३४ इतर नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या पोस्टरवर नेमण्यात आल्या आहे. या कुस्त्यांच्या लढतीसाठी निवेदक म्हणून बारामती येथील पै. प्रशांत भागवत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच संध्याकाळी सायली पाटील यांचा आर्केस्टा ठेवण्यात आला आहे

बुधवार दि.२ एप्रील रोजी दु. २ वाजल्यापासून भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कुस्ती व बैलगाडा शर्यत शौकीनांनी या दोन्ही खेळांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुळामाई देवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!