Disha Shakti

Uncategorized

माजी आमदार मुरकुटेंचा महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न*

Spread the love

*माजी आमदार मुरकुटेंचा महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न*

रमेश खेमनर अहमदनगर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयाकडून शेतीच्या पंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू आहे. या माेहिमेला नेवासेचे माजी आमदार व ईतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविला आहे.या माेहिमेला विराेध दर्शविण्यासाठी भाजपने आज नेवासे येथील महावितरणच्या तालुका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदाेलनावेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे चांगलेच आक्रमक झाले हाेते. त्यांची मागणी मान्य हाेत नसल्याने मुरकुटे यांनी महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांच्या आक्रमकपणामुळे कार्यालयात काही काळ गाेंधळ उडाला होता.
शेतकऱ्यांकडे वीज थकबाकी वसुलीसाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन ताेडण्यात येत आहे. ही माेहीम थांबविण्याची मागणीसाठी भाजपने माजी आमदार बाळसाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेवासे येथील कार्यालयात आंदाेलन केले. या आंदाेलनात मुरकुटे चांगलेच आक्रमक हाेत त्यांनी मागणी मान्य हाेत नसल्याचे पाहून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दाेरीमध्ये मान टाकून गळफास घेत हाेते. त्यावेळी त्यांना गळफास घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी आंदाेलनातील कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधा उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज माफ झालेच पाहिजे, अशा घाेषणा दिल्या. मागण्या मान्य करा, नाहीतर आत्महत्येला परवानगी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र ती मान्य न केल्याने मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गळफास घेण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे मुरकुटेविरुद्ध कायदेशीर कारवाई हाेण्याची शक्यता जात आहे.व महावितरण कार्यालयात जाऊन दोरी बांधून गळ्यात अटकवेपर्यंत कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी का रोखले नाही याबाबत चर्चेला उधाण आले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!