राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथे मनोकामना लक्ष्मी भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडवा तसेच मराठी नव वर्षाच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. काजल गुरु,पिंकी गुरु,उत्तम बाबा उल्हारे,यांच्या आशीर्वादाने तसेच आराधी जोगती समाज महासंघाचे अध्यक्ष दिनेश गुरु कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोकामना लक्ष्मी भवानी माता मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आराधी जोगती समाज महासंघाचे अध्यक्ष दिनेश गुरु कोकरे म्हणाले की,राहुरी फॅक्टरी प्रसादनगर भागात मनोकामना लक्ष्मी भवानी मातेचे भव्य मंदिर बांधणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या महान कामाला देणगी स्वरूपात हातभार लावून देवी मातेचा आशीर्वाद घ्यावा.
यावेळी दि.राहुरी अर्बन मल्टिपर्पज निधीचे संस्थापक चेअरमन रामचंद्र काळे,शिवसेना तालुका प्रमुख विजय गव्हाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल डोळस,तनिषा गुरु, लहुजी शक्ती सेनेचे नंदू उल्हारे,रोहित जोशी, संतोष हारदे,अशोक पवार,संदीप डुकरे, सोमा डुकरे,बंडू जाधव,गोरख नरोडे,प्रकाश पोटे,अलका मापारे,मीना देशमुख,लखन मापारे आदींसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a reply