विद्यापीठ प्रतिनिधी / आर. आर. जाधव : के के रेंज येथे चालु असलेल्या युद्ध सरावा वेळी एका विमानातून दि २४ मार्च रोजी वरवंडी शिवारात . राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांबु प्रकल्पावर एक बॉम्ब पडला होता सदर बॉम्ब मातीत रुतुन बसला आहे पडलेल्या बॉम्बची बातमी एअरफोर्स व लष्करी अधिकाऱ्यांना कळाले नंतर लष्कर व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पडलेल्या बॉम्बचे निरीक्षण करून सदर बॉम्ब डिफ्युज करण्याबाबत अश्वासन देऊन निघुन गेले मात्र आज पावेतो सदर बॉम्बची दखल अद्यापही कोणी घेतली नसल्याने वरवंडी पंचक्रोशीतील नागरीक जिव मुठीत घेऊन वावरत असल्याचे दिसुन येत आहे
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पाईप लाईन फुटल्या आहेत त्यांना फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करता येत नसल्याने त्यांची पिके धोक्यात आसी असुन जनावरांच्या व त्यांच्या पिण्याच्या पाणाचा प्रश्न निर्माण झाला आहे वास्तविक पहाता पडलेला बॉम्ब हा जिवंत असल्याने संरक्षण खात्याने ध्या बॉम्बची विल्हेवाट लवणे अवश्यक असताना देखील संरक्षण खात्याने जबाबदारी स्विकारलेली दिसुन येत नाही गेली नऊ दिवसांपासून हा बॉम्ब बेवारस पडलेला आहे त्या मुळे वरवंडी पंचक्रोशीतील जनता भितीच्या सावटाखाली वावरत आहे शेजारीच काही अंतरावर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण व महाराष्ट्राची कृषी पंढरी असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ असुन त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मा जिल्हाधीकारी व त्यांची महसुल यंत्रणा व जिल्हा पोलीस यंत्रणा यांना दि खबर पुरेपूर माहीत असुन नही या घटनेकडे गांभिर्याने लक्ष घालताना दिसुन येत नाही
हा बॉम्ब लवकरात लवकर डिफ्युज करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी वरवंडी पंचक्रोशीतील नागरीकांची मागणी आहे
वरवंडी शिवारात राहुरी कृषी विद्यापीठ बांबु प्रकल्पामध्ये पडलेल्या बॉम्बचा वाली कोण ?

0Share
Leave a reply