Disha Shakti

इतर

भिर्रर्रर्र… टाकळीढोकेश्वर येथे बैलगाडा शर्यतींचा थरार, बनाईदेवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन 

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण :  शेतकरी वर्गासाठी मुख्य आकर्षण असलेल्या पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल बनाईदेवी यात्रेनिमित्त गुरुवारी (दि ३) सकाळी आठ वाजता भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. या बैलगाडा शर्यतीचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवाजी खिलारी यांनी केले. उद्घाटनप्रसंगी उपस्थितांचे आभार बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे यांनी मानले. 

यावेळी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ऍड. बाबासाहेब खिलारी, माजी सभापती अरुण ठाणगे, खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, ग्राम. पं. सदस्य बापूसाहेब रांधवण, युवा उद्योजक संजय झावरे,धोंडीभाऊ झावरे, गणेश चव्हाण, उत्तम तळेकर,सचिन उगले, विवेक धुमाळ, वैभव पायमोडे, सचिन सैद, तुकाराम झावरे, विष्णू धुमाळ यांच्यासह बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वामी समर्थ नगर येथील घाटावर जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले बैलगाडा मालक आणि शौकिनांची मोठी गर्दी झाली होती.

भिर्रर्रर्र..भिर्र.. झाली.. आहा रे सर्जा..वाह रे पठ्ठ्या.. शाब्बास रे फकड्ड्या.. ‘

यामध्ये गावकीच्या बैलगाड्यासह एकूण २०० बैलगाडे स्पर्धकांनी सहभाग घेतला. एक दिवस रंगलेल्या या बैलगाडा शर्यतीचा आनंद हजारो बैलगाडाप्रेमींनी घेतला. बनाईदेवी यात्रोउत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. 

या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस महावीर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजेश भंडारी, सुनील फापाळे, डॉ. प्रदीप दाते यांनी ७५००/- हजार रुपये, द्वितीय क्रमांकास समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर यांनी ७५००/ – हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी सरपंच सचिन सैद, अभिनव पाटोळे, वासुंदे, राजूशेठ गागरे मांडवा, राहुल गुंड काटाळवेढा, संभाजी सुरसे भाळवणी, प्रकाश गाजरे, सरपंच म्हसोबाझाप, सचिन गोडसे, सावरगाव, गणेश रोकडे, वडगाव सावताळ यांच्या वतीने ५१००/- हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

 खासदार निलेश लंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, महावीर उद्योग समूहाचे प्रमुख राजेश भंडारी यांनी या नवीन बैलगाडा घाटासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे बनाईदेवी यात्रा कमेटीने व टाकळीढोकेश्वर ग्रामस्थांनी तसेच पारनेर तालुका बैलगाडा चालक मालक संघटनेने आभार मानले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!