Disha Shakti

इतर

मुळा धरणावर वादळी वाऱ्यामुळे केज प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान, शासनाकडून त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी – चेअरमन शरद बाचकर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मुळा धरणावर वादळी वाऱ्यामुळे केज प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुळा जलाशयात मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर आहे शासनाने या केज प्रकल्पधारकाणा अनुदान देण्याचे मंजुरी दिले आहे सर्व लाभार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून प्रकल्प उभारणी केलेली असताना अचानक 3 एप्रिल2025 रोजी आलेल्या वादळामुळे शेकडो प्रकल्प धारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रकल्प धारक पहिले मेटाकुटीला आलेला आहे तसेच अधिकाऱ्यांच्या मंजूर झालेले अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे मुळे लाभार्त्यांना अनुदान मिळालेले नाही त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असताना मस्त्य शेतकरी , प्रकल्प धारक कर्जबाजारी झाला आहे, खाजगी सावकारचे कर्ज, पतसंस्था यांचे तगादे यामुळे प्रकल्प धारक अडचणीत आलेला आहे आता झालेल्या दिनांक 3 4 2025 रोजी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात मुळा धरणावर वादळाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात होते धरणात केज प्रकल्प धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

काही केज लाभार्थ्यांचे फ्लोटिंग हाऊस घर तसेच शेड व मोठे मासे नेट जाळ्या तुटून मोठे माणसे तसेच नवीन सोडलेले मत्स्यबीज घरे इत्यादी पाण्यामध्ये वाहून गेले आहे तरी केज प्रकल्पधारकांची विनंती आहे की त्यांना शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई मिळते तसेच केज प्रकल्पधारकांना प्रकल्पाचा खर्च मोठा असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने ऐन वेळेस वादळामुळे जे नुकसान झाले आहे त्याची शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी अशी केज प्रकल्प धारक यांच्या वतीने जिल्हा मच्छिमार संघांचे चेअरमन शरद सबाजी बाचकर हे मस्त्यमंत्री निलेशजी राणे यांना भेटून प्रकल्प धारकांच्या व्यथा सांगणार आहे व भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे वेळ पडल्यास प्रकल्प धारक यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!