पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : आदर्शगाव हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेला चि. आर्यन राहुल बर्वे या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत एन.एम.एम.एस – एस.सी. गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले, शासनाने ही शिष्यवृत्ती परीक्षा आर्थिक मागास विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे या हेतूने वार्षिक 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
आर्यन बर्वेने ही शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष पदमश्री डॉ. पोपटराव पवार, एस.एम. सी. चे अध्यक्ष एस. टी. पादीर, रो. ना. पादीर,सहदेव पवार, रामभाऊ चत्तर, छबुराव ठाणगे, मंगेश ठाणगे मेजर, राजू ठाणगे मेजर, मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, दिपक ठाणगे, कैलास खैरे, नंदकुमार झावरे, निता सोनवणे तसेच सर्व ग्रामस्थ व पालकांनी आर्यनचे अभिनंदन केले.
Leave a reply