अरुंद पालखी महामार्गावरून,
धोकेदायक ऊस वाहतूक
जेजुरी (प्रतिनिधी) निलेश भुजबळ
पुणे – पंढरपूर पालखी
महामार्गावरील, जेजुरी औद्योगिक वसाहती पासून अरुंद आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस तीव्र उतार आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने, या महामार्गावरून, अवजड वाहतूक आणि भरीस भर ऊसाने भरगच्च भरलेला ट्रँक्टर व डबल ट्रँली रसत्याच्या मधोमध, अशी अवस्था मागील काही महिन्यांपासून दररोज या महामार्ग पाहावयास मिळत आहे.
पुरंदरच्या बागायती पट्ट्यातून अधिकचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टर – ट्रँली मागील वहनांची फिकीर न करता चढ्या आवाजात गाणी लावत येतात. त्यामुळे पालखी महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहानांच्या रांगाच रांगा लागत आहेत. कारखान्यांचा ऊस तोडणी हंगाम सुरु झाल्याने, वाल्हे, जेजुरी, नीरा, पिसुर्टी, मांडकी, जेऊर आदी परिसरातील बागायती गावातून मोठ्या संख्येने, काही नवे काही जुने जिर्ण, झालेले ट्रक, ट्रँक्टर, दोन ट्रँली धोकेदायक पद्धतीने अवजड वाहतूक करत असतात. ही धोकादायक वाहने भरमसाठ भरलेले ऊस वाहतूक करताना. रस्त्यावर मोठी कसरत करत असतात. नागमोडी पद्धतीने धिम्या गतीने चाललेले ट्रँक्टर ट्रँली ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारासह चारचाकी वाहन चालकांची मोठी कसोटी पणाला लागते. पुरंदर तालुक्यातील मोठी देवस्थान असलेली जेजुरी, वीर आदी ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना याच महामार्ग प्रवास करावा लागतो. तसेच, परिसरातून मोठ्या प्रमाणावर आता बागायती यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. पहाटेच्या वेळी तर हे ट्रँक्टर चालक मोकळ्या ट्रँल्या वेगात दामटतात. शिवाय कर्कश आवाजात गाणी वाजवतात.
जवळच्या गावातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रेलर जोडून लाकडी काठ्यांच्या सहाय्याने ट्रेलराच्या उंचीपेक्षा अधिक उंची निर्माण करून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक सुरु आहे. ट्रक व बैलगाड्यांच्या बाबतीतही तसेच सुरु आहे. अनेक वाहनांवर रिफ्लेक्टर लावले नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॅलीचा, तसेच ट्रॅक चा अंदाज न आल्याने, अपघाताची शक्यता जास्त आहे.
वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. सायंकाळ होण्यापूर्वी वाहनात भरलेला ऊस कारखान्यावर पोहचविन्याच्या घाईत क्षमतेपेक्षा जास्त भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगात कारखान्यात पोहचविणे सुरु आहे.
नेमके सायंकाळच्या सुमारास दररोज नोकदार वर्ग, औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच शाळकरी मुलांची रस्त्यावर गर्दी असते. मात्र, धोकेदायक ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना याचे काहीच फिकीर नाही. मात्र, ऊस वाहतूक करताना या गाड्यांनी मागून येणाऱ्या वाहनांना साईड न दिल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
फोटोओळ – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे – निरा (ता.पुरंदर) या मार्गावरुन, येथून क्षमतेपेक्षा अधिक, विना रिफ्लेक्टर, विना नंबर प्लेटचे, ट्रँक्टर ट्रँली धोकेदायक पद्धतीने, घेऊन जातात