अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये पकडलेल्या भिक्षेकर्यांपैकी चार भिक्षेकर्यांचा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी ही माहिती दिली. या प्रकाराच्या चौकशीसाठी तिघांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
दरम्यान, पकडलेल्या भिक्षेकर्यांना विसापूर येथील बेघर गृहात ठेवण्यात आले होते. त्यातील 10 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाचा सोमवारी व तिघांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. दोघेजण रूग्णालयातून पळून गेले असून अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत. श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये भिक्षेकर्यांना पकडण्यात आले होते. त्यापैकी काही भिक्षेकर्यांना विसापूर येथे रवाना करण्यात आले होते.
तिघे भिकारी गायब
जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या दहा भिकार्यांपैकी चारजणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक सोमवारी तर तिघेजण मंगळवारी मयत झाले. जिल्हा रुग्णालयात या प्रकारामुळे गोंधळ उडाला. यावेळी तिन भिकारी संधीचा फायदा घेवून पळून गेले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिर्डीत पकडलेल्या चौघा भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान मृत्यू, अहिल्यानगरमधील जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

0Share
Leave a reply