अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील स्व.कर्तुत्ववान युवा उद्योजक तथा विजय स्वीट मार्ट चे मालक काशिनाथ गाढवे यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी दिशा शक्ती न्यूजशी बोलताना गाढवे म्हणाले की, मोठा मुलगा राजकुमार राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन समर्पित भावनेने राष्ट्रसेवेचे काम करतो तर महेश हा उद्योग व्यवसाय व शेतीला हातभार लावून काम करतो याचा मला सार्थ अभिमान असून गेल्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत निव्वळ कष्टाला प्राधान्य दिल्याने व मित्रपरिवारांचा मोलाचा मार्गदर्शन तसेच कळत नकळत केलेले मदत आपण विसरू शकणार नसल्याचे सांगून तरुणांनी कोणत्याही कार्यात स्वतःला झोकून दिल्याशिवाय यशाला गवसनीअशक्य असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. नागनाथ कुंभार, अविनाश मोकाशे,, चंद्रकांत गुड, प्रसन्न कंदले, अप्पू धमूरे, प्रा. मल्लिनाथ बिराजदार, खंडू मुळे, गुणवंत मुळे, दीपक मोकाशी, बाळकृष्ण घोडके, श्रीकांत अणदूर कर, महेश गाढवे सह मित्रपरिवार उपस्थित होते
Leave a reply