दिशाशक्ती राहूरी / : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त तमनर आखाडा येथे भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन श्री हनुमान जन्मोत्सव आयोजन कमिटी, भजनी मंडळ व तमनर आखाडा ग्रामस्थ तर्फे दिनांक 12 .04. 2025 रोजी सायंकाळी चार ते आठ यावेळी करण्यात आले या मैदानात तमनर आखाडा केसरी 2025 या मानाच्या कुस्तीसाठी आयोजन कमिटीच्या वतीने मानाची चांदीची गदा व रोख रक्कम रुपये 21,000/- ठेवण्यात आले.
या मैदानात एकूण 70 कुस्त्या लावण्यात आल्या असून त्यास चांगले बक्षीस देण्यात आली आणि तमनर आखाडा केस री 2025 या कीताबासाठी मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर येथील डोंगरी विकास तालीम मांडवे बु. वस्ताद सुभाष बिडगर यांचा पट्टा पैलवान अवी शिंदे यांनी अवघ्या 25 सेकंदात निकाल या डावावर कुस्ती चित्रपट करून तमनर आखाडा केसरी 2025 हा किताब आयोजन कमिटीच्या वतीने मानाची चांदीचे गदा व रोख रक्कम 21 हजार रुपये देण्यात आली अशी माहिती श्री हनुमान जन्मोत्सव आयोजन कमिटीच्या वतीने पै. पंढरीनाथ मच्छिंद्र तमनर, प्रा. संजय भाऊराव तमनर, श्री गंगाधर भाऊसाहेब तमनर, श्री भानुदास पंढरीनाथ तमनर, श्री रामदास नारायण तमनर, श्री शरद गणपत तमनर, पै. संतोष मच्छिंद्र तमनर, श्री बाळासाहेब गोपीनाथ बाचकर, श्री लक्ष्मण तुकाराम तमनर, यांनी दिली
तमनर आखाडा हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानात पै.अवी शिंदे तमनर आखाडा केसरी 2025 चा मानकरी

0Share
Leave a reply