Disha Shakti

इतर

आमदार यांनी प्रहार पक्षाचे निवेदनही स्वीकारले नाही व मागण्या न ऐकून घेताच केला फोन कट, शेतकऱ्यांच्या मागण्या चे निवेदन आमदार राजेश पवार यांच्या घराला चिटकवींले

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : प्रहारचे नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व जनशक्ती पक्ष यांच्यावतीने शेतकरी कर्जमाफीसाठी दिनांक 11 एप्रिल रोजी विद्यमान आमदार यांच्या निवासस्थानासमोर प्रहार कार्यकर्ते जाऊन निवेदन देण्याचे ठरले असता त्यांचे निवेदन न स्वीकारण्यासाठी आमदार राजेश पवार गैरहजर राहिले व फोनवर देखील न बोलता फोन केला कट.

  प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नायगाव विधानसभेचे नेतृत्व गजानन पाटील चव्हाण, जिल्हा सचिव मारुती मंगरुळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ आंबटवार उर्फ मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कागडे, नायगाव तालुकाध्यक्ष साईनाथ बोईनवाड अंगत मुतखेडे साईनाथ धर्माबादकर चक्रधर पाटील हंबर्डे सह असंख्य कार्यकर्ते यांनी आपला नेता आमदार बच्चू भाऊ कडू यांचा आदेश पाळुन सदर संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या विविध मागण्या संदर्भात विद्यमान आमदाराच्या निवासस्थानासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपला भावना शासनास कळविण्यासाठी दिनांक 11 एप्रिल रोजी प्रहारचे कार्यकर्ते गळ्यात भगवी निळी लाल पिवळी दस्ती घालून नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या नांदेड येथील निवासस्थाना समोर गेले असता ते घरी नाहीत म्हणून समजले यावर संबंधित पोलीस प्रशासनाने त्यांना फोन करून बोलण्याचे विनंती केली 

मोर्चे करू आलेत म्हणून फोन लावून दिले फोनवर देखील त्यांच्या मागण्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी ऐकून न घेता उर्मट बोलतं माला जनतेचे काही देणे घेने नाही मनत फोन कट करून टाकला

तेव्हा गजानन चव्हाण यांनी आम्ही तुमच्या घराला निवेदन चिटकून जाऊ असे म्हणून आपला रोष व्यक्त केला आहे आणि उपस्थित मोर्चे करू देखील आमदार राजेश पवार बदल हातबल झाले यावरून असे दिसून येते की महायुतीचे सरकार महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम कायदा जर अमलात आणले तर लोकशाही संपवून एकाधिकारशाहीच त्यांची चालेल असे वाटते कोणत्याही घटकाचे मोर्चे आंदोलन उपोषण सहजरित्या चिरडल्या जाऊ शकतील.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!