राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 17/04/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गु र नं- 420/2025 बीएनएस कलम -137(2) प्रमाणे अल्पवयीन मुलगी वय-15 वर्ष, हिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, त्यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेणे कामी रवाना केले.
राहुरी पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून राहुरी, अहिल्यानगर व नगर तालुका अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला असता,सदर अल्पवयीन मुलगी वय वर्ष-15 ही,मदडगाव ता. जि.अहिल्यानगर येथे मिळून आल्याने मुलीला आरोपीसह ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून तिला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अपहरण केलेल्या आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस हवालदार नवले करत आहे.सदर राहुरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली, स.फौ/ तुळशीदास गीते, पोहेकॉ/विजय नवले, संदीप ठाणगे, पोकॉ/बडे, नदीम शेख, योगेश आव्हाड, मपोकॉ /वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे.
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिसांनी लावला 24 तासात शोध, मुलीस दिले आई-वडिलांच्या ताब्यात

0Share
Leave a reply