Disha Shakti

कृषी विषयी

मा.राज्यपाल श्री.सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 38 वा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 38 वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार दि. 22 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयासमोरील सभामंडपामध्ये होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन हे उपस्थित असणार आहेत. यावेळी कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. अॅड. माणिकराव कोकाटे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगाार राज्यमंत्री ना. अॅड. आशिष जयस्वाल आणि कृषि परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी नवी दिल्ली येथील कृषि शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 5,182 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील 4,812 स्नातकांना पदवी, 330 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 40 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!