*राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायतचे दुर्लक्ष*
*जिल्हा प्रतिनिधी – रमेश खेमनर*
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत गोटूंबे आखाडा येथील प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पाहणी केली असता गावातील एका ठिकाणी हापशा (हातपंप)बसवलेला आहे. त्याचे सांडपाणी थेट रस्त्यांवर सोडलेले असून ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आरोग्याविषयी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर रस्त्यावर ठिकठिकाणी सांडपाणी साचल्याने पायी चालण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच सांडपाणी रस्त्यांवर सोडल्यामुळे घाणीचे व डासांचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांना व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्रामपंचायत मध्ये काही अनेकवेळा ग्रामस्थांनी सांडपाण्याची लेखी व तोंडी तक्रार केली तसेच ग्रामसभेत विषय मांडूनही ग्रामपंचायतने आत्तापर्यंत फक्त पाहणी व मोजमाप करून 10 दिवसांत समस्या निवारण करण्याचे आश्वासन सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यामार्फत देण्यात आले होते परंतु दोन महिने उलटले तरी अजूनही त्या कामास मुहूर्त न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे फक्त निवडणूकी पुरते खोटी आश्वासने देणारे गेले कुठे व ग्रामस्थांच्या आरोग्याची दखल ग्रामपंचायत घेणार तरी कधी अशा तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.