Disha Shakti

सामाजिक

साहित्यिक गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

दिशाशक्ती मुंबई : मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत कोल्हापूर मधील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह मध्ये किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्रात राज्य आणि जिद्द फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन २०२५ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेता स्वप्नील राजशेखर ( शिकविण तुला मी धडा) अभिनेत्री शुभांगी गायकवाड व इतर प्रमुख उपस्थित भारत कवितके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या वेळी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्य, कला क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीला, संस्थांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.पैठणी प्रश्नमंजुषा समृद्धी प्रकाशन व्दारा प्रकाशित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आदी कार्यक्रम संपन्न झाले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रा. डॉ.बी.एन.खरात यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वाचे आभार मानून स्वागत केले.जिद्द फाउंडेशनच्या गीतांजली डोंबे डॉ बी.एन.खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!