राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : संभाजीनगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगाचा महामेळावा व विभागीय धनाजी संताजी पुरस्कार वितरण कार्यक्रम 23 एप्रिल रोजी श्री संत एकनाथ महाराज रंगमंदिर संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाला. 2012 मध्ये राहुरी तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून दिव्यांगासाठी विविध शिबिराच्या माध्यमातून. माणुसकीची भिंत, चला चुल पेटूया दिव्यांगाची, चला व्यावसायिक बनवूया दिव्यांगांना, चला घर बांधूया दिव्यांगाचे अशा अनेक उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवाला तालुक्यासह जिल्ह्यात न्याय मिळवून देण्याचे काम केले दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आदरणिय बच्चुभाऊ कडू यांचे हस्ते प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अहिल्यानगर चे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांना संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार मधील संत गाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ विभागातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले त्याबद्द्ल प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना याचे मनापासून आभार धन्यवाद हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून अहिल्या नगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेला समर्पित.
यावेळी निरीक्षक घनश्याम पेठे सर, प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गाडे साहेब अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे दक्षिण जिल्हा प्रमुख विनोदसिंग परदेशी साहेब महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख ऍड पांडुरंग औताडे जिल्हा सचिव हमीद भाई शेख जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख संपर्कप्रमुख पांडुरंग कासार बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे बीड जिल्हा सचिव कमलाकर वेदपाठक जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपटराव शेळके नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी राहता तालुका अध्यक्ष नितीन भन्साळी शिरसाठ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अनिल मगर,नेवासा तालुका अध्यक्ष दादासाहेब शेजुळ,राहुरी तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर, कोपरगाव तालुका प्रमुख प्रवीण भुजाडे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे, पारनेर तालुका अध्यक्ष अरविंद नरसाळे, जामखेड तालुका अध्यक्ष सचिन उगले सौ.कांता सरडे भिमाबाई शिर्के आदी.. चार जिल्ह्यातील हजारो प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने सदर कार्यक्रम संपन्न झाला.
मा. मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांना विभागीय प्रथम क्रमांकाचे संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान

0Share
Leave a reply