अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यात अव्वल असलेल्या स्वर्गीय सि .ना . आलूरे गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जवाहर पॅटर्न मराठवाड्यात अग्रेसर असून आता यात भर म्हणून जिल्हा परिषद शाळाही या शैक्षणिक क्षेत्रात नावारूपास येत असून गेल्या सहा वर्षा पासून जिल्ह्यात वत्सला नगर जिल्हा परिषद शाळेने मानाचा तुरा रोवला आहे. यंदा तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड झेप घेतल्याने पालकासह ग्रामस्थातून अभिनंदनचा वर्षाव होताना पाहावयास मिळत आहे.
गेल्या सहा वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमात अग्रेसर ठरून उपक्रमशील शाळा म्हणून खास ओळख निर्माण केले आहे हे विशेष. सध्याच्या या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात कितीही पैसे गेले तरी चालेल मात्र यशस्वी ठरला पाहिजे हे पाडल्यांच्या अपेक्षा असते, निव्वळ विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानून शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद अतोनात परिश्रम घेऊन अशक्य ते शक्य करण्याची किमया केल्याने संपूर्ण जिल्ह्यात शाळेचा विशेषतः गुरुजनांचा सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.
या परीक्षेत सृष्टी कांबळे, आदित्य गाढवे, राम कदम, कृष्णाई झंगे, समृद्धी कांबळे, समर्थ निर्मळे, अपेक्षा कबाडे, रुद्रा गिरी, उज्वल पवार, अमित सुरवसे, समृद्धी बनसोडे, समर्थ गोवे, निकत नदाफ, कार्तिक मुळे, पारस पवार हे 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा दराडे, बळीराम पांचाळ, भीमराव घोडके, एम बी स्वामी, व्ही व्ही आदम, व्ही आर खलटे, एस डी भागवत, डी जी आदरवाडा, एस डी गिरी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या सचोटीबद्ध मार्गदर्शनाचे यश असून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणे सहजासहजी अशक्य असून मेहनत तयारी व मार्गदर्शन यांचे खऱ्या अर्थाने फलित असल्याची भावना सुरेखा दराडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
या यशाबद्दल सरपंच रामचंद्र दादा आलूरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. विवेक बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अड.दीपक आलुरे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष कल्याणी मुळे, अविनाश मोकाशे, प्रबुद्ध कांबळे जय मल्हार पत्रकार संघाचे श्रीकांत अणदूर, दयानंद काळुंखे, चंद्रकांत गुड्ड्, शिवशंकर तिरगुळे, सचिन तो गी, शिवाजी कांबळे, चंद्रकांत हगलगुंडे यांनी अभिनंदन केले केले.
अबब… शिष्यवृत्ती परीक्षेत अणदूरच्या वत्सला नगर जिल्हा परिषदेचा डंका, तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक अभिनंदनाचा वर्षाव

0Share
Leave a reply