अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अण्णा चौकातून मुख्य रस्त्यावरून महादेव मंदिरापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, अखंड हिंदुस्तानचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यापाऱ्यानी कडकडीत व्यवहार बंद ठेवून निषेध रॅलीला पाठिंबा दिला. नळदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
काश्मीर मधील पहलगाम येथे नुकताच पाकिस्तानी आतंकवाद्यानी हिंदू पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आता गावागावातून हिंदूंनी हिंदू साठी एकोप्याने व्यवहार करण्याची गरज असून पाक व्याप्त काश्मीर ही ताब्यात घेण्याची संधी निर्माण झाली आहे. देशात व राज्यात आता तर गावागावात हिंदूनी नीच प्रवृत्तीच्या दहशतवादी विचारसरणी ठेचून काढली गरज असून यासाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची काळाची गरज असून राज्यात व केंद्रात सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अड. दीपक दादा आलूरे यांनी केले. यावेळी राजकुमार गाढवे, योगेश जाधव, साहेबराव घुगे, राजेंद्र स्वामी, अरविंद घोडके यांनी या निषेध सभेत पाकच्या धोरणावर कडकडून टीका केली.
या निषेध सभेत दीपक घुगे, महावीर कंदले, माणिक निर्मळे, अण्णासाहेब आलूरे, प्रकाश मुळे, गुणवंत मुळे, लक्ष्मण लंगडे, मनोज काळे, महादेव उर्फ छोटू घुगे, विक्रम आलूरे, प्रवीण घोडके, मनोज मुळे, मकरंद भालकरे, आकाश आळंगे, लक्ष्मण बोंगरगे सह असंख्य तरुण सहभागी झाले होते. शेवटी आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आतंकवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, अणदूर येथे भव्य निषेध रॅली व कडकडीत बंद

0Share
Leave a reply