बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील गोरोबाकाका नगर कासराळी येथे वारकरी संप्रदायातील थोर संत कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दिपप्रज्वलन करून महाआरती करण्यात आली. समाज बांधवांच्या वतीने प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच वारकरी सांप्रदायातीक भजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी कुंभार समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला होता. यामध्ये कुंभार समाजातील महिला भगिनींनी, पुरुष बांधव आबालवर्धन, मोठ्या संख्येनी उपस्थित होते. गोरोबा काकांची पुण्यतिथी यशस्वीतेसाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले होते.
Leave a reply