प्रतिनिधी / रमेश खेमनर : आज पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक (ग्रामीण) येथे ग्रामीण पोलीस वाहनांचे वितरण कार्यक्रम पार पडला.जिल्हा नियोजनतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहने झाली उपलब्ध करून देण्यात आली यावेळी पालकमंत्री नामदार श्री. छगन भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेंकर, पोलीस निरीक्षक विशेष शाखा अकबर पटेल, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण,पोलीस निरीक्षक मिलिंद तेलुरे, जितेंद्र मोटर्स प्रा.ली. संचालक जितेंद्र शाह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहनांची उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभेल !अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार श्री. छगन भुजबळ यांनी दिल्या. जिल्ह्यात प्रथमत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली बहुतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी महिला अधिकारी यांना सूपूर्द करण्यात आली आहेत. डायल 112 ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होणार असून या प्रणालीत मध्यवर्ती वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत.
प्रत्येक गाडीचे लोकेशन वॉर रूमला या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, घटनास्थळी जेथे दुर्घटना घडली असेल किंवा नागरिकांना पोलीसांची मदत हवी असेल अशा ठिकाणी विनाविलंब सिग्नलद्वारे यंत्रणेला सूचना मिळून पोलीसांची मदत वेळेत उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला सुरक्षा व्यवस्थेत चोखपणे काम करता येणे शक्य होणार आहे.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात चार जणांना वाहनांचे वितरण करण्यात आले.यावेळी पोलीस अधिक्षक कार्यालय येथील आपत्कालिन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षास भेट दिली. या कक्षात डायल 112 कार्यप्रणाली संगणकप्रणालीद्वारे कसे चालते याची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.