Disha Shakti

Uncategorized

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शेतकऱ्याच्या झोपडीला आग दोन लाख रुपयांसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे :  बीड येथील मोहम्मद शेख या शेतकऱ्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून केलेली कमाई घरामध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे.  मोहम्मद शेख यांनी घरामध्ये  ठेवलेले दोन लाख रुपये अक्षरशः जळून खाक झाल्या. अर्धवट जळालेल्या नोटा बघून शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं आहे.

मध्यरात्री अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या दारात बांधलेल्या शेळ्या मेल्या. आयुष्यभर पै पै करून जमवलेली जमापुंजी डोळ्यादेखत जळून गेली. याच आगीमध्ये एक वृद्ध महिला आणि छोटी मुलगी सुद्धा जखमी झाली आहे. ही दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील वहिरा या गावात घडली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील शेतकर्‍याच्या राहत्या घरात गॅसचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत पाच शेळ्या होरपळून मृत्यूमुखी पडल्या तर एका वृद्धेसह लहान मुलगी यामध्ये जखमी झाली. आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून  दोन लाख रुपयांची रोकड या आगीत जळाल्याने मोहम्मद शेख या शेतकऱ्याने पई पई केलेली कमाई डोळ्यांसमोर जळून गेली आहे.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे मोहम्मद शेख हे शेतकरी कुटुंब राहतं. रात्री जेवण केल्यानंतर हे कुटुंब झोपी गेलं असता अकरा वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. कुटुंबातील लोक तात्काळ घराबाहेर पडले. नेमके काय झाले हे समजण्याच्या आत घराला आग लागली. या स्फोटात गॅसची टाकी घटनास्थळापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर जाऊन पडली. मोहम्मद शेख यांच्या घराला आग आधी लागली की स्फोटानंतर लागली हे समजू शकले नसले तरी या दुर्घटनेत शेतकरी  मोहम्मद शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीमध्ये पाच शेळ्या, होरपळून मृत्यूमुखी पडल्या तर एका वृद्ध महिलेसह मुलगी जखमी झाली आहे.  या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने या शेतकऱ्याने आयुष्यभर केलेली कमाई जी घरांमध्ये ठेवली होती ती डोळ्यादेखत जळून गेली.

एक ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात गावकर्‍यांना यश आले. तोपर्यंत मात्र शेख कुटुंबियांचे घर आगीने आपल्या विळख्यात घेऊन खाक करून टाकले होते. जखमी वृद्ध महिला आणि मुलीस नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोठ्या कष्टाने जमवलेली जमापुंजी जळून गेली


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!