नांदेड प्रतिनिधी (धम्मदीप भद्रे) दिशाशक्ती न्यूज दि.०९ऑगस्ट: नायगाव तालुक्यातील देगाव येथील भूमिपुत्र. शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ चळवळीचे ज्येष्ठ नेते. मा. सुरेशदादा गायकवाड. यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आजादी का अमृत महोत्सव’भारत सरकार च्या हर घर तिरंगा’ अभियान राबवत, प्रजासत्ता पार्टीचे युवा नेते राहुल गायकवाड यांच्या वतीने 65 झेंडे व संभाजी गायकवाड व पिंटू माधव गायकवाड यांच्यावतीने प्रत्येकी 10 झेंड्याचे वाटप. दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनीचे औचित्य साधून आज रोजी मौजे देगाव तालुका नायगाव (खै ) या ठिकाणी वाटप करण्यात आले.
यावेळी रावसाहेब मोरे,सरपंच डॉ. दत्ता मोरे , ग्राम विकास अधिकारी बॉण्डले. सामाजिक कार्यकर्ते. संभाजी गायकवाड, व्यंकटी गायकवाड ,शेषेराव रोडे, तुकाराम मोरे,नामदेव चिंचलवाड, चंद्रकांत गायकवाड,विठ्ठल मोरे ,गोविंद उपासे ,प्रभाकर गायकवाड, पांडुरंग माऊली, संजय रोडे,माधव रोडे , अविनाश गायकवाड , सुभाष गायकवाड, माधव गायकवाड, अमोल रोडे , अनिल गायकवाड,अमोल गायकवाड, बंटी गायकवाड, पिंटू गायकवाड व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सर्व व गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक- प्रजासत्ता पार्टीचे नायगाव तालुकाप्रमुख. अविनाश गायकवाड. यांच्या वतीने राबवण्यात आला होता.