जिल्हा प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे कांडाळकर) : नरसी रामतीर्थ ठाण्याचे संयमी असून सक्षम अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी नरसी चौरस्तावरील शंभर फूट रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून नरसी येथील अतिक्रमण हटविले आहे त्यामुळे नरसी चौरस त्याने मोकळा श्वास घेतला आहे रामतीर्थ ठाण्याला दोन वर्षात तब्बल सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पदभार सांभाळला त्यामुळे ठाणे प्रमुखांचा विषय चर्चेचा बनला होता परंतु सपोनी संकेत दिघे यांच्या कौतुकास्पद व पारदर्शक स्तुती केली आहे.
नांदेड हैद्राबाद महामार्गावर आलेले रामतीर्थ ठाणे येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी अवघ्या १५ दिवसात कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे सांभाळून एक शिस्त लावली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी नरसीत आठ दिवसांपूर्वी जनसागर उसळला होता त्या अनुषंगाने रामतीर्थ पोलीसांनी परिस्थितीवर अंकुश ठेवून चोख बंदोबस्त यशस्वीरीत्या सपोनि दिघे यांनी पार पाडला होता रामतीर्थ ठाण्याचा दोन वर्षाचा लेखाजोखा पहिला तर संकेत दिघे हे सातवे अधिकारी असुन यापूर्वी अवघ्या एका महिन्यांपूर्वी रामतीर्थ ठाण्याला पल्लेवाड हे रुजू झाले होते मात्र त्यांना देखील फक्त १५ दिवसात परत बोलाविण्यात आले होते. दरमान्या रामतीर्थ ठाण्याचा यापूर्वीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा कार्याकाळ पहिला तर त्यात प्रामुख्याने विश्वास गोळे पाटील जगताप. खंदाडे, दिलीप गाडे, सोमनाथ शिंदे, महादेव पुरी, विजय जाधव. यांनी आपल्या कार्यकाळात रामतीर्थ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संकेत दिघे यांच्याही कामात पारदर्शकता असल्याने सामान्य नागरिक त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करीत आहोत.