प्रतिनिधी (रमेश खेमनर) : दि.10/08/2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिम्मित हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत राहुरी नगरपरिषदेने शहर स्वछता मोहिम आयोजित केली होती यामध्ये राहुरी तहसील कार्यालययातील कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी, राहुरी नगरपरिषद कर्मचारी या सर्वांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. हर्षदादा तनपुरे लाभले होते तसेच मा.उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, श्री.अनिल पवार यांच्या हस्ते प्रारंभी या स्वच्छता मोहिमेची व रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मा.तहसीलदार शेख साहेब, मा.मुख्याधिकारी राहुरी नगरपरिषदेचे बांगर साहेब, पंचायत समितीचे मा.गटविकास अधिकारी ढवळे सर व राहुरी, मा.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.