Disha Shakti

Uncategorized

मुगाव येथील दलीतवस्तीचा निधी हडप करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची साईनाथ कांबळे यांची मागणी

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी  धम्मदीप भद्रे : दि.11 ऑगस्ट, नायगाव: तालुक्यातील मुगांव येथे पंधरा वित्त आयोग या निधीतून मागासवर्गीय वस्तीत करावयाचे पेव्हर ब्लॉक चे काम इतरत्र केल्याने आणि अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीसाठी अडचण निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कांबळे यांनी मुगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्याकडे दिले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सविस्तर वृत्त असे की, मौ.मुगांव ता. नायगाव येथे 15 वित्त आयोग या योजने अंतर्गत मागासवर्गीय वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तीन लाख रुपयाचा निधी शासनाकडून सन 2021-22 मध्ये ग्रामपंचायतीस प्राप्त होता.सदर निधी येथील सरपंच सौ. दैवशाला गणेश गाडले, ग्रामसेवक व्यंकटेश पाटील बामनीकर व कनिष्ठ अभियंता जिरवणकर आदीच्या संगनमताने सदर काम मागासवर्गीय समाजाबद्दल आकस बुद्धीने ज्या ज्या ठिकाणी एकही मागासवर्गीय समाजातील घर किंवा व्यक्ती वास्तव्यास नाही अशा ठिकाणी करून निधी हडप केला आहे असा आरोप निवेदनात केले.

जातीय द्वेषातून सदर काम इतरत्र केले किंबहुना केलेले काम ही बोगस व निकृष्ट पद्धतीचे आहे.आणि दुसरा विषय असा की,गावातील अंतर्गत रस्त्यावर येथील रहिवाशी असलेले भारत तुकाराम कांबळे यांनी अनधिकृत पणे पक्के बांधकाम करून रस्ता काबीज केले आहे या अतिक्रमणामुळे सदर रस्त्या लगत असलेल्या प्लॉट धारकांना,बालकांना, वृध्दांना,काट्याची कसरत करावी लागत आहे.ये जा करताना,धान्य व इतर अत्यावश्यक वस्तू डोक्यावर घेऊन जाताना जोखीम पत्कराव लागत आहे.जेंव्हा की अतिक्रमना पूर्वी सदर रस्त्यावर छोटे ऑटो,दुचाकी,सायकल अशा प्रकारची वाहने सहज जाऊ शकत होते.याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.

ग्रामपंचायतीचे ढिसाळ कारभार यास कारणीभूत आहे.वेळोवेळी गावातील सुजान नागरिकांनी ग्रामसेवक,सरपंच यांना सांगितले आणि विनंती केले तरी ग्रामसेवक व्यंकटेश पाटील,सरपंच सौ. दैवशाला गणेश गाडले मनमानी कारभार चालवत आहेत.म्हणून सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मागासवर्गीय वस्तीची निधी हडप करणाऱ्या वर तत्काळ अट्रोसिटी गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करावी. व अतिक्रमण करणाऱ्या वर तात्काळ कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कांबळे यांनी स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुगांव च्या समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव,तहसीलदार नायगाव,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे दिले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!