विशेष प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) दि. ११ ऑगस्ट, जालना : इनकम टॅक्स विभागाची जालन्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या कारवाईमध्ये तब्बल ३९० कोटी जप्त करण्यात आले आहेत. सध्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून यामुळे अजय देवगनचा रेड सिनेमा आठवतो. पैसे कुठे लपवले जातात, शोधण्यासाठी काय शक्य लढवली हे या सिनेमात पाहायला मिळालं. जालन्यात झालेली इनकम टॅक्स धाड आहे त्याच सिनेमाशी जुळते.
या आठ दिवसांच्या छापेमारीमध्ये पोलिसांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांच्याही प्रकरण यासमोर फेल आहे. काही दिवसांआधी पश्चिम बंगालमध्ये इनकम टॅक्स विभागाने छापे टाकले होते. याच्यामध्ये उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात आतापर्यंत २० कोटी इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दरम्यान, प्राप्तीकर खात्याकडून गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यात सुरू असणाऱ्या छापेमारी मोहिमेची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. या छापेमारी सत्रात जिल्ह्यातील स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांकडील तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती प्राप्तीकर खात्याकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोने असल्याची माहिती आहे. आयकर खात्याकडून गुरूवारी संध्याकाळी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच या सगळ्या प्रकरणातील एक-एक दुवा समोर यायला सुरुवात झाली आहे.
जालन्यातील स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांची कर वाचवण्यासाठीची एक चलाखी जीएसटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील जीएसटी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्याचे समजते. या छापेमारीत तब्बल ५८ कोटी रूपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोनं, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज आणि सुमारे ३०० कोटी रूपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या