राहुरी प्रतिनिधी (प्रमोद डफळ) : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार बसणार नाही. असा इशारा अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारला दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अतिवृष्टीने खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही. शेतकरी कसे तरी दिवस काढत असून बळीराजाच्या जीवावर जे राज्य चालतं त्या बळीराजाचे असे हाल बघून नुसते नावाला देश आणि राज्य कृषीप्रधान आहे. शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात असताना सरकारचे कर्तव्य आहे की, शेतकऱ्याला आधार देणे. मात्र मागील सरकारनेही बळीराजाच्या तोंडाला कात चुना टाकून शेतकऱ्यांची मजा घेतली. आता या नव्या सरकारने तातडीने एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. नाहीतर पुढील परिणामाला सामोरे जा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हे संपूर्ण राज्यांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उग्र क्रांतीचे जनक आहेत. हे सर्वश्रुत आहे. रवींद्र मोरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस कांदा दूध या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला घाम फोडला आहे.
रवींद्र मोरे यांच्या आंदोलनाची दखल प्रशासन स्तरावर नाहीतर राज्यस्तरावर घ्यावी लागते. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारला प्रथम इशारा देताना म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न बघता लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करून बळीराजाला दिलासा द्यावा. नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून उग्र क्रांती घडवून आणेन. असे रवींद्र मोरे यांनी सरकारला इशारा देताना पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतनिधीला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे देणे घेणे नसून एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत बोलायला तयार नाही. अशा निर्लज्य लोक प्रतिनिधींचा मी निषेध करतो. येणाऱ्या काळात एकाही लोक प्रतिनिधीला रस्त्यावर फिरू देणार नाही. स्वाभिमानी स्टाईलने लोक प्रिनिधींना जाब विचारल्या शिवाय सोडणार नाही. असे अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.