नांदेड प्रतिनिधी ( धम्मदिप भद्रे) : स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत या तीन दिवस आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा या अभियानास जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आव्हान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भारतीय जनता पार्टी ग्रामीण चे अध्यक्ष श्री वेंकटराव पाटील गोजेगावकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व कुटुंबाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावे अशा सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार “स्वाभिमान तिरंगा अभिमान तिरंगा” हर भारतीयांच्या हृदयात तिरंगा हे वाक्य समोर ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरावर 13 अगस्त ते 15 ऑगस्ट या सतत तीन दिवस राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून जिल्ह्यातील सर्व जनतेने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकून हर घर तिरंगा ह्या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे व जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक तलाठी शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्राम स्तरावरील प्रतिष्ठित नागरिक इत्यादींच्या प्रमुख मार्गदर्शनात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
शासनाच्या या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सर्व नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे