Disha Shakti

Uncategorized

विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व गुण येण्यासाठी वाचन महत्वाचे – डॉ. मिलिंद अहिरे

Spread the love

प्रतिनिधी (रमेश खेमनर)  राहुरी विद्यापीठ, दि. 13 ऑगस्ट, 2022 : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या अंगी वकृत्व कला असणे फार गरजेचे आहे. वाचणाची आवड असेल तर वकृत्वाची कला सहज साध्य होते. यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करायला हवे असे प्रतिपादन हाळगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. अहिरे बोलत होते.

यावेळी भारताची वाढती लोकसंख्या, भारताच्या विकासातील सहकार चळवळीचे महत्त्व व भारतीय स्त्रियांचा प्रेरणादायक प्रवास या विषयावर विद्यार्थ्यांनी व्याख्याने दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास पोखरकर, अजिंक्य साबळे, स्वप्निल धुमाळ, सुशांत बिराजदार, अक्षय पवार आश्लेषा डमरे यांनी स्पर्धेत भाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रेरणा भोसले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. मनोज गुड, सौ. वैशाली पोंदे, सौ. ज्योती सासवडे व सौ. विद्या पुजारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!